घरात किती रोख रक्कम आणि सोने ठेवू शकतो?
1. पश्चिम बंगालमधून कॉंग्रेसच्या 3 आमदारांना 49.8 लाख रुपयांसह ताब्यात घेतले. 2. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकून ईडीने 11 लाखांची रक्कम जप्त. 3. अर्पिता मुखर्जीच्या घरातून ईडीने सुमारे 50 कोटी रक्कम आणि 6 किलो सोने जप्त केले. अर्पिताच्या एक घरातून 22 कोटी भेटलेत आता विचार करा एखादा व्यक्ती महिन्याला जरी 10 लाख कमवत असेल तरी एवढे पैसे कमवायला 20 वर्षे लागतील, आणि आपल्यासारखे 9 to 5 जॉब करणारे असले तर 10 लाख कमवायला 10 वर्ष लागतात. चला असो गेल्या एका आठवड्यातील या 3 बातम्या जास्तच चर्चेत होत्या. सरकारी यंत्रणांच्या या छाप्यांमुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की आपण घरात किती रोख रक्कम आणि सोने ठेवू शकतो? आज याच प्रश्नांची उत्तरे पाहुयात सगळ्यात आधी रोख रकमेविषयी: कोणताही सामान्य माणूस आपल्या घरात हवी तितकी रक्कम ठेऊ शकतो, परंतु या रकमेची अधिकृत माहिती असणे आवश्यक आहे. समजा तुमच्या घरात 5 कोटी रुपये ठेवले आहेत आणि तपास यंत्रणांनी छापा टाकला तर अशा परिस्थितीत तुम्हाला या रकमेशी संबंधित अधिकृत पुरावे दाखवावे लागतील. तपासादरम्यान तुम्ही तुमच्या घरातू...