घरात किती रोख रक्कम आणि सोने ठेवू शकतो?

1. पश्चिम बंगालमधून कॉंग्रेसच्या 3 आमदारांना 49.8 लाख रुपयांसह ताब्यात घेतले. 2. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकून ईडीने 11 लाखांची रक्कम जप्त. 3. अर्पिता मुखर्जीच्या घरातून ईडीने सुमारे 50 कोटी रक्कम आणि 6 किलो सोने जप्त केले.
अर्पिताच्या एक घरातून 22 कोटी भेटलेत आता विचार करा एखादा व्यक्ती महिन्याला जरी 10 लाख कमवत असेल तरी एवढे पैसे कमवायला 20 वर्षे लागतील, आणि आपल्यासारखे 9 to 5 जॉब करणारे असले तर 10 लाख कमवायला 10 वर्ष लागतात. चला असो गेल्या एका आठवड्यातील या 3 बातम्या जास्तच चर्चेत होत्या. सरकारी यंत्रणांच्या या छाप्यांमुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की आपण घरात किती रोख रक्कम आणि सोने ठेवू शकतो? आज याच प्रश्नांची उत्तरे पाहुयात सगळ्यात आधी रोख रकमेविषयी: कोणताही सामान्य माणूस आपल्या घरात हवी तितकी रक्कम ठेऊ शकतो, परंतु या रकमेची अधिकृत माहिती असणे आवश्यक आहे. समजा तुमच्या घरात 5 कोटी रुपये ठेवले आहेत आणि तपास यंत्रणांनी छापा टाकला तर अशा परिस्थितीत तुम्हाला या रकमेशी संबंधित अधिकृत पुरावे दाखवावे लागतील. तपासादरम्यान तुम्ही तुमच्या घरातून जप्त केलेल्या रकमेची अधिकृत माहिती न दिल्यास, तुम्हाला 137% पर्यंत दंड भरावा लागेल.याशिवाय, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या म्हणजेच CBDT च्या 26 मे 2022 पासून देशात लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, एक व्यक्ती एका वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार करू शकत नाही. आता सोन्याबद्दल बोलायचे झाल्यास हे देखील जाणून घ्या की जगातील एकूण सोन्यापैकी 11% सोने भारतीय महिलांकडे आहे सोन्याला पैशाप्रमाणेच महत्त्व आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कितीही सोने घरात ठेवू शकता. मात्र जितके सोने आहे त्याची अधिकृत माहिती आणि पुरावे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.घरात जास्त सोने असल्यास कोणती कागदपत्रे दाखवावी लागतील? जर तपास यंत्रणेने घरातून जास्त प्रमाणात सोने जप्त केले, तर आयकर कायदा 1961 च्या कलम 132 नुसार, आयटी अधिकाऱ्यांना त्याची अधिकृत माहिती विचारण्याचा अधिकार आहे. या अंतर्गत प्रामुख्याने 3 प्रकारांपैकी कोणतीही कागदपत्रे दाखवावी लागतात. पहिले: तुम्ही सोने खरेदी केले असेल तर तुम्हाला त्यासंबंधीची कागदपत्रे दाखवावी लागतील. दुसरे: कुटुंबाकडून सोने मिळाल्यास कौटुंबिक सेटलमेंटशी संबंधित कागदपत्रे दाखवावी लागतात. तिसरे: जर तुम्हाला भेटवस्तूमध्ये सोने मिळाले असेल, तर त्याच्याशी संबंधित गिफ्ट डीड दाखवावे लागेल. स्वातंत्र्यानंतर देशात एखादी व्यक्ती त्याच्याकडे किती सोने ठेवू शकते यासाठी 1968 सुवर्ण नियंत्रण कायदा लागू करण्यात आला. निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त सोने घरात ठेवण्यावर या कायद्याद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले. 1990 नंतर, हा कायदा रद्द करण्यात आला आणि लोकांना अधिकृत माहितीसह कितीही सोने बाळगण्याची मुभा देण्यात आली. अधिकृत पुरावा नसतानाही घरात सोने ठेवता येते का? भारतीय समाजात लग्नापासून प्रत्येक सणात सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. अशा परिस्थितीत कोणताही कागद किंवा पुरावा नसतानाही ठराविक प्रमाणात सोने घरात ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. जाणून घेऊया सरकारी नियमानुसार किती सोने ठेवता येते.विवाहित महिला 500 ग्रॅम सोने ठेवू शकते. अविवाहित महिला 250 ग्रॅम सोने ठेवू शकते. विवाहित आणि अविवाहित पुरुष 100 ग्रॅम सोने ठेवू शकतात. पण सध्याची परिस्थिती पाहता आम इंसान सोने की चैन तो क्या चैन से सोना तक नसीब नही हो रहा.

Comments

Popular posts from this blog

भारतीय पाककृती

पहिल्या महिला मुख्यमंत्री : सुचेता कृपलानी

जागतिक नारळ दिवस