जागतिक नारळ दिवस
जागतिक नारळ दिवस आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला नारळाची उपमा दिली म्हणजे तो व्यक्ती कसा असेल अर्थातच बाहेरून कठोर दिसणारा पण मनातून अगदी निर्मळ आणि मनाला भावून जाइल असा, नाही का. आणि हे जे नारळ आहे त्याचे कित्येक तरी फायदे आहेत. केवळ खाद्य आणि अखाद्य उपयोगांव्यतिरिक्त मानवी आयुष्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या या फळाचा आज दिवस आहे म्हणजेच आज जागतिक नारळ दिवस म्हणजेच world coconut day आहे. म्हणूनच जाणून घेऊ याच फळाबद्दल काही विशेष व मजेशीर बाबी. नारळाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक नारळ दिन २ सप्टेंबरला साजरा केला जातो. खाद्यपदार्थांपासून औषधांपर्यंत, पूजाविधीपासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत आणि असे अगणित उपयोग आहेत या नारळाचे. कोकोनट हा नट नाही तो स्टोन फ्रूट आहे.नारळाचे तेल हे अन्य कुठल्या फळाच्या तेलापेक्षा सौंदर्यप्रसाधनांमध्ये सर्वात जास्त वापरले जाते. नारळ हा समुद्रात कितीही दूरपर्यंत व कितीही दीर्घ काळ तरंगत जाऊ शकतो.. त्यांनतरही त्याचा रुजण्याचा गुणधर्म टिकून असतो. नारळाला कोकोनट हे नाव अर्धे पोर्तुगीज नावाड्यांकडून तर अर्धे इंग्लंडमध्ये मिळाले आहे. १६ व्या श...