मासिक पाळी

स्त्रियांचा आयुष्यातील अविभाज्य घटक म्हणजे मासिक पाळी पण भरपूर महिला ह्या अश्या आहेत की ज्यांना अनियमित मासिक पाळी चा त्रास होत असतो आणि त्या याकडे दुर्लक्ष करतात ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो सर्वात अधितर आपण बघुयात की अनियमित मासिक पाळी म्हणजे काय नॉर्मली मासिक पाळी मधील अंतर हे 28 ते 35 दिवसांचे असते पण काही महिलांच्या बाबतीत हे अंतर वाढते किंवा मग काम होते त्यांना 28 ते 35 दिवसांच्या आधीच किंवा नंतर मासीक पाळी सुरू होते. या कडे जर का वेळीच लक्ष नाही दिले तर pcod, pcos असे आजार उद्भवू शकतात. अनियमित मासिक पाळी नियमित व्हावी या साठी काही उपाय आहेत जे केले तर नक्कीच फायदा होईल. आधी तर आपण पाहुयात की मासिक पाळी अनियमित होण्यामागची कारणं काय आहेत. जास्त तणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो. या व्यतिरिक्त म्हातारपणाचा किंवा तरुणपणाचा परिणामही मासिक पाळीवर दिसून येतो. ज्या स्त्रियांचं वय 40 पेक्षा जास्त आहे त्यांना मोनोपॉज पूर्वी मासिक पाळीमध्ये अनियमितता असू शकते. या व्यतिरिक् तरुण स्त्रियांमध्ये संप्रेरक बदलांमुळे देखील मासिक पाळीत अनियमितता येती.
आता मोनोपॉज म्हणजे काय ते पाहुयात. मासिक पाळीची सुरुवात ९ ते १५ वर्षे वयाच्या मुलींमध्ये दिसून येते. आणि साधारणपणे वयाच्या ४५ ते ५५ वर्षांपर्यंत स्त्रियांना पाळी येते. त्यांनंतर पाळी येणे बंद होते. पण ते बंद होण्या आधी महिलांच्या शरीरात काही असे बदल होतात ज्यामुळे त्यांना मासीक पाळी मध्ये रक्तस्त्राव खूप कमी किंवा खूप जास्त होत असतो. साधारणतः मासिक पाळी ही साधारणपणे 3 ते 6 दिवसांची असते पण मोनोपॉज मध्ये हे दिवस खूप कमी किंवा खुप जास्त होऊन जातात सोबतच त्यांना ओटीपोटात दुखणे कंबर, पाय दुखणं असे अनेक समस्या येत असतात. आता बघुयात की अनियमित मासिक पाळीचा त्रास कोणाला होऊ शकतो. लहान मुलींमध्ये सुरूवातीची २ वर्षे पाळी अनियमित असू शकते, परंतु मधल्या संपूर्ण काळात नियमितरित्त्या पाळी येणे हे स्त्रीच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. डॉक्टरांच्या मते ज्या स्त्रिया बहुतेक गर्भनिरोधक गोळ्या वापरतात त्यांनादेखील मासिक पाळीशी संबंधित अनियमितता आढळते. गर्भ निरोधक गोळ्या शरीरातील संप्रेरकांवर परिणाम करतात. मासिक पाळी अनियमित होण्याचं आणखी एक कारण म्हणजे वजन वाढणे वजन वाढल्यावर शरीराला जास्त इन्शुलिन तयार करण्याची गरज असते त्यामुळे पाली येण्यात उशीर होत असतो. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणं हा एक चांगला उपाय आहे फक्त मासिक पाळी साठीच नाही तर चांगल्या आरोग्यासाठीही मासिक पाळीच्या दिरंगाईची सर्व कारणं लक्षात ठेवून, नित्यक्रम आयोजित करणं, शिस्तबद्ध ठेवणं आणि तणाव मुक्त राहण्याचा प्रयत्न करणं खूप महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम करा आणि प्राणायाम करा आणि सकाळी फिरायला जा, जेणेकरून शरीरात पुरेसा प्राणवायू वाहू शकेल. प्रथिनं आणि जीवनसत्त्वंयुक्त आहार घ्या. पुरेशी झोप घ्या जेणेकरून आरोग्य चांगले राहील. प्रत्येक महिलेला कुठल्या न कुठल्या गोष्टीचे टेन्शन हे असतेच. कधी कामाचे टेन्शन तर कधी कुटुंबाचे टेन्शन. जर तुम्हीही जास्त टेन्शन घेत असाल तर आजच ही सवय सोडा कारण याचा शरीरावर अनेक प्रकारे वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त तणावामुळे GnRH नावाच्या संप्रेरकाचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे ओव्हुलेशन किंवा मासिक पाळी येत नाही. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नये. कधी कधी अचानक येणारा ताप, सर्दी, खोकला किंवा कोणत्याही दीर्घ आजारामुळेही मासिक पाळीला उशीर होऊ शकतो. हे जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा घडते आणि एकदा का तुम्ही आजारातून बरे झालात तर तुमची मासिक पाळी पुन्हा नियमित होते. बदलत्या वेळापत्रकामुळे, बदलत्या शिफ्टमध्ये काम करणे, गावाबाहेर जाणे किंवा घरातील लग्न किंवा समारंभ यामुळे अनेक वेळा आपला दिनक्रम बदलत राहतो. या कारणामूळे मासिक पाळीच्या तारखा देखील वर आणि खाली जाऊ शकतात. एकदा का शरीराला या वेळापत्रकाची सवय झाली की, मासिक पाळी देखील नियमित होते. मासिक पाळी येण्यास उशीर होण्याची सर्व कारणे लक्षात घेऊन दैनंदिन आयुष्यावर विशेष लक्ष ठेवणे गरजेचं आहे. याशिवाय नियमित व्यायाम, प्राणायाम करा आणि मॉर्निंग वॉकसाठी जा, जेणेकरून शरीरामध्ये पुरेपूर ऑक्सिजन येईल. त्याचबरोबर चांगला आहार ठेवा, ज्यामध्ये सर्व प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतील. तसेच पुरेशी झोप घ्या, वाढत्या वजनामुळे शरीराला जास्त इन्सुलिन तयार करावे लागते, त्यामुळे मासिक पाळीला उशीर होतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा, यासाठी व्यायामासोबतच असा आहार घ्यावा.

Comments

Popular posts from this blog

भारतीय पाककृती

पहिल्या महिला मुख्यमंत्री : सुचेता कृपलानी

जागतिक नारळ दिवस