वडापाव
मुंबईकरांची ओळख थोडक्यात द्यायची म्हंटली तर समुद्र, बॉलीवूड आणि वडापाव अशी दिली जाते. आणि हा वडापाव फक्त मुबंईच नव्हे तर महाराष्ट्र,भारतच काय तर अमेरिकेतही लोकप्रिय झाला आहे.आज ह्या वडापावला एवढा का मान दिला जातोय.तर आज जागतिक वडापाव दिवस आहे ना म्हणून.आणि तसही आपल्या भारताच्या प्रत्येक खाद्यपदार्थाला सगळीकडेच मनाचं स्थान आहे. म्हणजे त्याचा दिवस असो किंवा नसो पण तो पदार्थ खाल्ला की आपला दिवस नक्कीच बनतो, नाही का. आणि त्यात हा वडापाव अगदी कमी किंमतीत पोट भरणारा पदार्थ. आता हा जगप्रसिद्ध आणि जगप्रिय वडापाव चा शोध कोणी लावला तर या डिशचा शोध 1966 मध्ये मुंबईकर अशोक वैद्य यांनी लावला होता,
ज्यांनी दादर रेल्वे स्थानकासमोर पहिला वडा पाव स्टॉल उघडला, ज्याद्वारे शेकडो हजारो कामगार ज्यांना पटकन, स्वस्त नाश्त्याची गरज होती. आणि गरज असल्यामुळे हा वडापाव मुंबईकरांमध्ये झटपट हिट झाला. बरं हा वडापाव इथेच नाही थांबला बरं का पुढे याची लोकप्रिय होण्याची हौस देशाबाहेर जाऊनही संपलेली नाहीच.असो त्यामुळे आपल्या भारताचे नाव मोठं होतंय. ह्या वडापावचा शोध लावणारे वैद्य मुंबईचे आयकॉन राहिले आहेत; एका स्थानिक पत्रकाराने त्याच्याबद्दल वडा पाव इंक नावाचा एक माहितीपटही बनवला आहे.
हा वडापाव इतक्या कमी साहित्यात आणि झटपट बनतो आणि हो मस्त ही लागतो. त्यामुळेच एवढ्या लवकर लोकप्रियतेचा उच्चांक गाठलाय याने. आज प्रत्येक चौकात, गल्लीत, हॉटेल, मॉल कुठेही गेलं तरी वडापाव च एक तरी दुकान आपल्याला दिसतच. म्हणजे यावरून वडापावची लोकप्रियत दिसून येते. या वडापाव मध्ये ना आता भरपूर डिफरेंट वाराईटी बघायला मिळतात जस की चीझ घातलेला, मका घातलेला मेयोनीज घातलेला, टोमॅटो सॉस लावलेला अशी मोजतही येणार नाही एवढी प्रगती ह्या आपल्या वडापाव ने केलीये. आता लवकरच ह्या वडापाव ला पिझ्झा आणि बर्गर ची जागाही मिळेल असा चित्र दिसतंय.

Comments
Post a Comment