गोगाबाबा
विद्यापीठात सोनेरी महलच्या मागे गोगाबाबा टेकडी सर्वपरिचित आहे. गिर्यारोहण, पहाटे, संध्याकाळी फिरायला येणाऱ्यांत टेकडी लोकप्रिय आहे; पण ज्यांच्या नावाने ही टेकडी ओळखली जाते, त्या गोगाबाबांविषयी बहुतेकांना माहितीच नाही, हे तुम्हाला माहितेय का?
नाथ पंथातील संत गोगानाथ तीन महाराज यांची ही तपोभूमी... त्यांचा जन्म इसवी सन १००३ राजस्थानमधील चुरू (ददरेवा) येथे झाला. बेगमप युवावस्थेत महाराज औरंगाबादमध्ये अखंड टेकडीवर ध्यानसाधना करताना येथील आहे. गवळी समाजातील लोकांना दिसले. या महाराजांनी भाविकांच्या आग्रहाखातर जन टेकडीवरून खाली पायथ्याशी व नंतर बेगमपुऱ्यात (जिथे आज मंदिर आहे) ध्यानधारणा केली, अशी आख्यायिका आहे. या तपस्वीमुळे ही टेकडी गोगाबाबा टेकडी म्हणून ओळखली जाऊ लागली. राजस्थानमधून जे हिंदी भाषिक लोक औरंगाबादमध्ये आले, त्यांचे हे दैवत होय.
नाथ तीन मंदिरांत अखंड दिवा
गोगाबाबा टेकडीवरील मंदिर, पायथ्याचे मंदिर व बेगमपुरा मंदिरात अखंड दिवा प्रज्वलित दिसतो. यात टेकडीवरील मंदिरात तेलाचा दिवा, पायथ्याशी मंदिरात गावरान तुपाचा दिवा व बेगमपुरा येथील मंदिरात गावरान तूप व तेलाचा असे दोन्ही दिवे मध्ये अखंडपणे प्रज्वलित असतात. अनेक शतकांपासूनची ही परंपरा थील आहे.
जन्मोत्सव निशाण काठी शोभायात्रा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी बेगमपुरा येथील मंदिरातून निशाणकाठी मिरवणूक निघते व टेकडीच्या पायथ्याशी मंदिरात जाऊन पुन्हा बेगमपुऱ्यात आणली जाते.
मूर्ती नव्हे, फोटो गोगाबाबांच्या तीन मंदिरात गोगाबाबांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली नाही. येथे नवनाथांबरोबर गोगाबाबांचा फोटो ठेवण्यात आला आहे. भाविक या फोटोचे व अखंड दिव्याचे दर्शन घेतात.
लग्नाचे पहिले आमंत्रण गोगाबाबांना
राजस्थानमधून आलेले हिंदी भाषिक बांधव गोगाबाबांना दैवत मानतात. घरात कोणाला नवीन नोकरी लागली की, आधी गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी भंडारा दिला जातो. लग्नाची पहिली पत्रिका गोगाबाबांना अर्पण करून त्यांना लग्नाचे निमंत्रण देतात.

Comments
Post a Comment