स्त्री
मी ना लहानपणा पासून हेच ऐकत मोठी झालीये की तुझ्या लग्नात हे करायचंय तुझ्या लग्नात ते करायचंय पण कधी मी हे नाही ऐकलं की आम्हाला ना तुला खूप मोठी, स्वतःच्या पायावर उभी असलेली, तुझं एक वर्चस्व असलेलं पाहायचं. माध्यमवर्गीय असलेल्या घरात मी जन्मले आहे. आणि माझ्यासारख्या अनेक मध्यमवर्गात जन्मलेल्या मुली हेच ऐकत मोठ्या होतात. ज्यांच्या मागे बारावी झाली की लग्न- लग्न म्हणून भुणभुण सुरू होते. मुलगी वयात अली आता लवकरच लग्न उरकायला हवं असे विचार असणाऱ्या देशात आपण राहतो, आपल्या देशात जिथे मुलीचं लग्न तिच्या शिक्षणापेक्षा, वायापेक्षा जास्त असतं. हे असं का बरं?
मुलांना तर कधीच अस बोलत नाहीत जोपर्यंत तो चांगल्या पगाराच्या नोकरीला लागून स्वतःच घर वगैरे घेत नाही. मग दोघांना सारखी वागणूक का देत येत नाही आपल्या समाजाला.
राष्ट्रमाता जिजाऊ, अहिलयाबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रुद्रमादेवी, देवी प्रभावती, राणी लक्ष्मीबाई, राणी चीन्नमा, रझिया सुल्तान, जहाँआरा बेगम, चांद बीबी, ताराबाई, संयुक्ता देवी, सिंधुमाई सपकाळ, नूरजहाँ, अक्का महादेवी, कनकलता, उदा देवी, कित्तूर चिन्नम्मा, सरोजिनी नायडू, अरुणा असफ अली आणि अश्या अनेक महिला आहेत ज्यांनी नाव कमावलं आहे आणि कमवत आहेत. बऱ्याच प्रमाणात आता स्त्रिया प्रारएक क्षेत्रात उतरत आहेत आणि उत्तम कामगिरी करत आहेत.
आपण नेहमीच आपल्या पुराणात अस पाहिलंय की पूर्वीच्या काळी स्वयंर होत असायचे. म्हणजे यात मुलीला तिला जो मुलगा आवडेल आणि तिच्या म्हणण्यानुसार ती म्हणेल तेव्हच तीच लग्न केलं जाई. सीता, द्रोपदी अशी अनेक उदाहरण आहेत ज्यांनी स्वयंवरातून आपला जीवनसाथी निवडला होता. मग का आता आपल्याकडे न विचारता, मर्जी नसताना मुलींच लग्न लावून दिल जात? कुठल्याही बाबतीत कमी नाही हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. उलट सहनशीलता पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये जास्त आहे. प्रत्येक काम स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कधी जास्त चांगलं करू शकतात.
पण ह्या सर्वांमध्ये एक गोष्ट येते तू म्हणजे लग्न, आणि आपल्या देशात बालविवाह ही एक साधी गोष्ट आहे पण त्यामुळे कित्येक मुलींचे स्वप्न नष्ट होऊन जातात. आयुष्य जगण्यासाठी एक जोडीदार हवा असतो ते मान्य आहे पण तो कधी आणि कसा निवडावा हा प्रश्न सर्वस्वी त्या मुलीचा आणि मुलाचा असायला हवा. कारण ज्या व्यक्ती सोबत आयुष्य घालवायच आहे तो व्यक्ती आवडत नसेल तर जगण्यात रस उरत नाही सतत चे भांडण, क्लेश ह्यामुळे दोघांचीही मानसिक स्थिती बिघडू शकते. आणि वयाची अठरा वर्षे पार करताना फक्त अभ्यासवरच लक्ष असत शाळेतून नुकतंच बाहेर पडलेले असतात त्यात काय कळणार की आपण लग्नासारखी एवढी मोठी जबाबदारी उचलण्यास समर्थ आहोत. लग्नासाठी शरीरीकच नव्हे तर मानसिक आणि आर्थिक स्थिती ही बघणं गरजेचं असत, ते जो पर्यंत नसेल तो पर्यंत लग्न करू नये असं मला वाटत.
लग्नाचं वय 18 वरून आता 21 करण्यात आलाय हे एक मनाने चांगलंच आहे कारण 18 वर्षे तर बरीवतच होतात. पुढच शिक्षणही होत नाही. आणि आपण खऱ्या अर्थाने जगात 18 वर्षांचे झाल्यावरच उतरतो. जगाची समज यायला लागते.
पण आपण ज्या समाजात राहतो तिथे लागचे वय 30 जरी केले ना तरी बालविवाह काही थांबनार नाहीत कारण अजून भारतातील काही भागांत वैचारिक पातळी खूप खालावलेली आहे.

Comments
Post a Comment